दरोड्यातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:24 AM2021-09-07T04:24:29+5:302021-09-07T04:24:29+5:30

अकोट : अकोटात भरदिवसा घरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींची कारागृहात रवानगी ...

Defendants remanded in judicial custody | दरोड्यातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दरोड्यातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Next

अकोट : अकोटात भरदिवसा घरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.

अकोटात व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घरी ३१ ऑगस्ट रोजी कोरोनाचा लसीकरण सर्व्हे असल्याचा बनाव करून दरोडा टाकणारे मोलकरीण वैशाली विठ्ठल टवरे, पती विठ्ठल नामदेव टवरे (रा.शिवाजीनगर मोठे बारगण अकोट), संगम गणेशराव ठाकरे, त्यांची पत्नी अमृता संगम ठाकरे, भाऊ सागर गणेशराव ठाकरे (रा. येवदा जि. अमरावती, हल्ली मुकाम कबुतरी मैदान, अकोट) तर सीमा विजय निंबोकार (रा.नरसिंग कॉलनी अकोट) या आरोपींना ३ सप्टेंबर रोजी अटक करून पोलीस कोठडी घेतली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर ६ सप्टेंबर रोजी अकोट न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास अधिकारी शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, डीबी स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे करीत आहेत.

Web Title: Defendants remanded in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.