वृक्षतोड सुरूच, वन विभागाकडून केवळ पाहणीचा देखावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:07+5:302021-03-04T04:34:07+5:30
वन विभागाच्या पाहणीदरम्यान दिग्रस, तुलंगा परिसरात हिरवेगार वृक्ष तोडण्यात आल्याचे बुधवारी आढळून आले. वृक्षतोड करणारे पहाटेच्या सुमारास येऊन अवघ्या ...
वन विभागाच्या पाहणीदरम्यान दिग्रस, तुलंगा परिसरात हिरवेगार वृक्ष तोडण्यात आल्याचे बुधवारी आढळून आले. वृक्षतोड करणारे पहाटेच्या सुमारास येऊन अवघ्या दोन तासात मोठेमोठे चार ते पाच हिरवेगार वृक्ष तोडून पसार झाले होते. या ठिकाणी घरगुती इंधनासाठी लाकूडफाटा जमा करताना गावातील एक इसम दिसून आला. या परिसरात दररोज वृक्षतोड होत असल्याची माहिती दिग्रस येथील प्रतीक गवई, भारत कृषक समाजाचे गोविंद रोकडे पाटील, तुलंगा येथील प्रसेनजीत रोकडे, वंचित युवक आघाडीचे सुमेध हातोले यांनी वन विभागाला दिली होती. त्यानुसार आलेगाव वन विभाग कर्मचारी या ठिकाणी आले होते आणि पाहणी करून सांगोळामार्गे चतारी परिसरात तपासणी करायला गेले असता, त्याठिकाणी
चतारी शिवारात वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळून आला. वन विभागाने लाकडांसह ट्रॅक्टर जप्त केला. कारवाई करण्यासाठी आलेगाव कर्मचारी वन परिक्षेत्र अधिकारी, आलेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एस. बी. ढेंगे वनरक्षक एल. बी. खोकड यांनी कारवाई केली.
फोटो: