गणेश सजावट स्पर्धेत डेहनकर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:12+5:302021-09-21T04:21:12+5:30

अकोला- शिवस्मारक समितीच्यावतीने आयोजित इको फ्रेंडली घरगुती गणेश सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रथम पारितोषिक प्रा. प्रमोद ...

Dehankar first in Ganesh decoration competition | गणेश सजावट स्पर्धेत डेहनकर प्रथम

गणेश सजावट स्पर्धेत डेहनकर प्रथम

googlenewsNext

अकोला- शिवस्मारक समितीच्यावतीने आयोजित इको फ्रेंडली घरगुती गणेश सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रथम पारितोषिक प्रा. प्रमोद देहनकर यांना देण्यात आले. द्वितीय पारितोषिक सुजल पाटील यांना तर तृतीय पारितोषिक वरद डिकुटवार यांनी पटकविला.

अनंत चतुर्दशी दिनी सहकारनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रांगणात आयोजित पारितोषिक वितरणात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आलीत.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. रवीकुमार राऊत,अवचार, प्रा. डॉ. ममता इंगोले, डॉ.नितीन गायकवाड, शरद कोकाटे आदी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विलास हरणे होते.यावेळी कोकाटे यांनी उपस्थितांना शाडू मातीपासून मूर्ती निर्माणचे मार्गदर्शन केले. या इकोफ्रेंडली घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये एकूण ९४ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार ३००१ रुपये, द्वितीय २००१ रुपये, तृतीय पुरस्कार १००१ रुपये व ५ प्रोत्साहनपर बक्षिसे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत

प्रोत्साहनपर पारितोषिके प्रणिता हुजवांत, संजय पोहरे,कीर्ती भंसाली,राजेंद्र सोनवणे, गुंजन डहाके तसेच उत्कृष्ट शाडूंच्या मूर्तीकरिता प्रोत्साहनपर बक्षीस पूर्वा ताठे,रवीना केडिया,वैष्णवी मोहोड,वैष्णवी ढवळे,स्वराली भुसारी,वैष्णवी राजपूत, सौ राजश्री जंजाळ,दिनेश बाहकर,गोपाल घैत,हिमंशु राठोड यांना प्रदान करण्यात आले. स्पर्धा परीक्षण प्रा. डॉ.ज्ञानसागर भोकरे,आशिष चौथे,तुषार जायले यांनी केले. नंदूभाऊ चतरकर,चेतन ढोरे,नीलेश निकम,डॉ नितीन गायकवाड, विलास हरणे,सौ अश्विनी भोकरे यांच्या आर्थिक सहकार्याने संपन्न या स्पर्धेचे संचालन चेतन ढोरे यांनी,प्रास्ताविक प्रा.डॉ. ज्ञानसागर भोकरे यांनी तर आभार पंकज जायले यांनी मानले.

Web Title: Dehankar first in Ganesh decoration competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.