‘डीबीटी पोर्टल’व्दारे शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास विलंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:56 PM2018-09-17T15:56:14+5:302018-09-17T15:56:38+5:30
अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी पोर्टल) व्दारे राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गत आठवडाभरापासून सुरु करण्यात आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी पोर्टल) व्दारे राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गत आठवडाभरापासून सुरु करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी ‘डीबीटी पोर्टल’व्दारे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास विलंब झाल्याने, यंदा दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची आशा मावळली आहे.
अनुसूचित जाती. विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजे-एनटी) व इतर मागासवर्गीय (ओबीसी ) इत्यादी प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर (जुलैपासून ) विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतात; परंतू, सन २०१८-१९ यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, ‘डीबीटी पोर्टल’मधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. गत आठवडाभरापासून शासनाच्या ‘डीबीटी पोर्टल‘व्दारे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्याचे काम प्रायोगित तत्वावर सुरु करण्यात आले असले तरी, शिष्यवृत्तीसाठी ‘डीबीटी पोर्टल ’ व्दारे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या कामास विलंब झाल्याने, यंदा दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याची आशा मावळली आहे.
सन २०१८-१९ या वर्षातील शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीसाठी शासनाच्या ‘डीबीटी पोर्टल’व्दारे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याचे काम प्रायोगिक तत्वावर गत आठवडाभरापासून सुरु करण्यात आले आहे.
-अमोल यावलीकर
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.