कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:44 PM2019-11-26T13:44:47+5:302019-11-26T13:45:00+5:30
अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अकोेला: जिल्ह्यात कांदा उत्पादन वाढत आहे; परंतु अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्याला शेतकरी गटदेखील कांदा लागवडीसाठी पुढे आले आहेत. शेतकरी गटांनी कांदा लागवड करू न भरघोस उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. कांदा बीजोत्पादनपासूनदेखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्याकडेही वळला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे लागवडीस एक महिना उशीर झाला आहे. अकोला तालुक्यातील शिवापूर, चिखलगाव, कापशी, माझोड आदी गावच्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे.
जिल्ह्यात कांदा उत्पादन वाफा पद्धतीने घेतले जाते. या पिकातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटांनी अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणाºया या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा संकल्प शेतकरी गटांनी केला आहे. शेतकरी गटांना कांदा बीजोत्पादनासाठी मदत केली तसेच कृषी विभागाने काढलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळीला प्रोत्साहन दिले आहे. या जिल्ह्यात कांदा चाळी निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, कांदा पिकाचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचा विश्वास शेतकºयांना आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी कांदा चाळी तयार केल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन केले.