मणीपूर राज्याचे शिष्टमंडळ भेटले अकोला मनपा अधिका-यांना
By admin | Published: September 15, 2014 01:51 AM2014-09-15T01:51:53+5:302014-09-15T01:51:53+5:30
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात केली चर्चा
अकोला : मणीपूर राज्य महानगरपालिका संचालनालयाचे सचिव व उच्च अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने रविवार, १४ सप्टेंबर रोजी अकोला महापालिकेच्या अधिकार्यांची भेट घेऊन शहरातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात चर्चा केली.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत मणीपूर राज्य महापालिका संचालनालयाचे सचिव आर.के. दिनेशसिंह, संचालक एन. गीतकुमारसिंह, बिष्णुपूर मनपाचे कार्यकारी अधिकारी संजोबा सिंग, जिरीबाम मनपाचे कार्यकारी अधिकारी हरीकुमारसिंह, थोवुबालचे कार्यकारी वाय. कुलचंदासिंग यांनी शहरातील घनकचरा व्यवस्था पनावर महापालिकेच्या अधिका-यांशी चर्चा केली.
बैठकीला मनपा उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने, सह आयुक्त राजेंद्र घनबहादूर, कार्यकारी अधिकारी जी.एम.पांडे यांच्यासह अजय गुजर, जयप्रकाश मनोहर, नंदलाल मेश्राम, संदीप गावंडे, अनिल बिडवे, वासुदेव वाघळकर, सुरेश पुंड, श्याम बगैरे, एस.पी. काळे, युसुफ, डॉ. उद्धव सोनुने, योगेश मारवाडी, संजय खराटे, किरण शिरसाट, जयस्वाल, नितीन ताकवाले, राजेश पथ्रोट, निरज ठाकूर आदि उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनावर वाढणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने अकोला व अमरावती अभ्यास दौर्यावर आलेल्या या शिष्टमंडळासोबत सार्वजनिक पथदिवे व शहर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानावरदेखील चर्चा करण्यात आली.