डेल्टा प्लस: लक्षणांकडे दुर्लक्ष ठरू शकते घातक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:54+5:302021-06-29T04:13:54+5:30
अहवालाची प्रतीक्षा जीएमसीच्या लॅबमधून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरएनएचे २२० सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले. हे सॅम्पल दिल्ली स्थिती ‘आयजीआयबी’ या ...
अहवालाची प्रतीक्षा
जीएमसीच्या लॅबमधून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरएनएचे २२० सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले.
हे सॅम्पल दिल्ली स्थिती ‘आयजीआयबी’ या लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत.
सर्वप्रथम १२० सॅम्पल आणि त्यानंतर १०० सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पहिल्या सॅम्पलमधून एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मात्र दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेल्या सॅम्पलच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
धोका कायम, तरी अकोलेकर गाफील
डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात कोविडची स्थिती नियंत्रणात असली,तरी धोका अजूनही टळलेला नाही. अशा परिस्थितीतही अनेक नागरिक विनामास्क बाजारपेठेत फिरताना दिसून येत आहेत. अकोलेकरांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही आहेत डेल्टा प्लसची लक्षणे
सामान्य लक्षणे
म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.
घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार
तीव्र लक्षणे
छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
ही देखील आहेत लक्षणे
त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल
असा टाळता येईल धोका
घराबाहेर पडताना मास्कचा उपयोग करा.
आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा.
किमान २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा.
इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा, लोकांपासून ६ फूट अंतर ठेवा.
घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण करा.
बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.
जिल्ह्यात सध्याची स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही याविषयी मार्गदर्शन द्यावे. कोविडची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेतच चाचणी करून उपचारास सुरुवात करावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला