जिल्हा योजनांसाठी १६२ कोटींची अर्थमंत्र्यांकडे मागणी
By admin | Published: March 6, 2017 02:15 AM2017-03-06T02:15:43+5:302017-03-06T02:15:43+5:30
नागपुर येथे बैठक; विकासकामांसाठी अतिरिक्त निधीची गरज.
अकोला, दि. ५- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर प्रारूप आराखड्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी नागपुरात आयोजित बैठकीत घेतली. त्यामध्ये विविध विकासकामांसाठी यंत्रणांच्या मागणीनुसार १६२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केले. शासनाच्या कमाल आर्थिक र्मयादेनुसार सन २0१७-१८ या वर्षीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १0५ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या प्रारूप आराखड्याचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी विविध विभागांमार्फत १६२ कोटी ९ लाख २९ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.