हॉटेलमध्ये ५० टक्के आसन क्षमतेस परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:37+5:302021-03-13T04:34:37+5:30

अकोला : कोरोनामुळे मागील १५ दिवसांपासून हॉटेल, रेस्टॉरेंट, उपहारगृह यांना आठवड्यातील केवळ ५ दिवस पार्सल देण्याची मुभा आहे. या ...

Demand for 50 per cent seating capacity in hotels | हॉटेलमध्ये ५० टक्के आसन क्षमतेस परवानगी देण्याची मागणी

हॉटेलमध्ये ५० टक्के आसन क्षमतेस परवानगी देण्याची मागणी

Next

अकोला : कोरोनामुळे मागील १५ दिवसांपासून हॉटेल, रेस्टॉरेंट, उपहारगृह यांना आठवड्यातील केवळ ५ दिवस पार्सल देण्याची मुभा आहे. या आदेशामुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे आसन क्षमतेच्या ५० टक्के सेवा देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खाद्यपेय विक्रेता असोसिएशनने केली आहे.

हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेले आचारी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आसन क्षमतेच्या ५० टक्के सेवा देण्याची तसेच शनिवारी व रविवारी पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी अकोला जिल्हा सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दि. १२ मार्च रोजी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या निवेदनावर योगेश अग्रवाल, दीपक बोरा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

काेट

केवळ पार्सलच्या भरवशावर हा व्यवसाय तग धरू शकणार नाही. काेराेना चाचणीतही पाॅझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काेराेना नियमांचे पालन करून ५० टक्के क्षमतेनुसार परवानगी दिली तर या व्यवसायातील कारागीर, वेटर सर्वांच्या राेजगारावर मर्यादा येणार नाही.

याेगेश अग्रवाल, अध्यक्ष, खाद्यपेय विक्रेता असोसिएशन

Web Title: Demand for 50 per cent seating capacity in hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.