वान धरणातील पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:17 AM2021-02-08T04:17:00+5:302021-02-08T04:17:00+5:30
तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी व वान पाणी बचाओ संघर्ष समितीने मुंबई येथे १६ डिसेंबर रोजी जलसंपदा विभाग ...
तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी व वान पाणी बचाओ संघर्ष समितीने मुंबई येथे १६ डिसेंबर रोजी जलसंपदा विभाग मंत्रालयात निवेदन देऊन मागणी केली होती. अकोला शहराकरिता २९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अमृत योजनेचा व ९ डिसेंबर २०२० रोजीचा बाळापूर व अकोला तालुक्यातील गावांकरिता पाणी पुरवठा योजनेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन दिले होते. त्याबाबत शेतकऱ्यांसोबत मंत्रालयात बैठकसुद्धा झाली होती. वान धरणावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारासुद्धा दिला होता. परंतु सदर बैठकीमध्ये जलसंपदा विभागाद्वारे अकोला जिल्ह्यातील सर्व धरणांचे संबधी चौकशी करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आले होते. तालुक्यातील वान धरणातील पाणी अमृत योजनेंतर्गत अकोला शहर व बाळापूर तालुक्याला देण्याबाबतचे दोन्ही शासन निर्णय कायमस्वरूपी रद्द करणे व भविष्यात पिण्याकरिता कोणताही प्रस्ताव मंजूर न करता वान धरणातील पाणी तेल्हारा तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षित करण्याची मागणी समितीने ना. जयंत पाटील यांच्याकडे केली. यावेळी वान पाणी बचाओ संघर्ष समितीचे अनिल गावंडे, शंकरराव पुंडकर गुरुजी, ॲड. सुधाकरराव खुमकर, ॲड. संदीप देशमुख, श्रीकृष्ण ठाकरे, हरिदास वाघ, मनोहर चितलांगे, गोपाल मंत्री, रामभाऊ फाटकर, मंगेश घोंगे, योगेश बीचे, दीपक अहेरकर, सतीश उंबरकर, पप्पूसेठ सोनटक्के, गोपाल जळमकर, ज्ञानेश्वर नराजे, उमेश कोरडे आदी शेतकरी उपस्थित होते.