खदानीचे खोलीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:26+5:302021-04-01T04:19:26+5:30
शहरात पुरातनकालीन खदान हिंदू स्मशानभूमी परिसरात आहे. या परिसरातील खदानीत बारा महिने पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने या खदानीचे ...
शहरात पुरातनकालीन खदान हिंदू स्मशानभूमी परिसरात आहे. या परिसरातील खदानीत बारा महिने पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने या खदानीचे खोलीकरण करून समातलकरण करावे, जेणेकरून बारा महिने पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे व शहरात असलेल्या जलस्रोताची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. गोयंनका नगर पाण्याच्या टाकीतील वाया जाणारे पाणी थेट पाईपलाईन टाकून खदाणीत सोडण्यात यावे, शहरातील नागरिकांना दरवर्षी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. खदानीत पाण्याचा साठा उपलब्ध राहिल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही. गाडगे महाराज यांची कर्मभूमी असलेल्या मूर्तिजापूर शहरात तहानलेल्या मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय व्हावी हाच यातील उद्देश आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन खदानीचे खोलीकरण करण्याची मागणी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनातून केली आहे.