मूर्तिजापूर शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:59+5:302021-04-30T04:23:59+5:30
लसीकरणासाठी दररोज सकाळी नऊ वाजल्यापासून वृद्ध महिला व पुरुषांच्या लसीकरण केंद्रासमोर लांबलचक रांगा लागत आहेत. सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस ...
लसीकरणासाठी दररोज सकाळी नऊ वाजल्यापासून वृद्ध महिला व पुरुषांच्या लसीकरण केंद्रासमोर लांबलचक रांगा लागत आहेत. सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या उन्हाळ्यात नागरिकांना लसीकरणासाठी उन्हात चटके खात रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन मूर्तिजापूर शहरात लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाकडे भरपूर प्रमाणात मोठमोठे सभागृह आणि प्रशस्त इमारती उभ्या आहेत. त्या जागेचा प्रशासनाने उपयोग करून त्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे. जेणेकरून नागरिकांसाठी सुविधेचे होईल. मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या बघता, लसीकरण केंद्रे वाढविणे गरजेचे झाले आहे. स्टेशन विभागात व जुनी वस्ती परिसरात प्रत्येकी दोन लसीकरण केंद्रे सुरू करावीत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.