तहसीलदार पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:54+5:302021-02-05T06:11:54+5:30
निवेदनामध्ये तहसीलदार प्रदीप पवार हे मंगरुळपीर येथे कर्तव्यावर असताना, शासकीय धान्य गोदामातील अंदाजे ७० लक्ष रुपयांचा रेशनचा माल परस्पर ...
निवेदनामध्ये तहसीलदार प्रदीप पवार हे मंगरुळपीर येथे कर्तव्यावर असताना, शासकीय धान्य गोदामातील अंदाजे ७० लक्ष रुपयांचा रेशनचा माल परस्पर गहाळ करून विकला होता. याबाबत वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी २१ मे, २०१४ रोजी आदेश पारित करून प्रदीप पवार यांच्याकडून २० लाख ७५ हजार रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. विभागीय आयुक्त साहेबांनीही वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा रिकव्हरी आदेश कायम ठेवला होता. असे असतानाही शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने प्रदीप पवार यांच्याकडून घोटाळ्याच्या प्रकरणामधील रिकव्हरीची रक्कम वसुल केली नाही, तसेच फौजदारी गुन्हाही दाखल केला नाही. या प्रकरणामध्ये मूर्तिजापूर येथील तहसीलदार यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्वरित निलंबित करण्यात यावे, अशा मागणीची तक्रार राजेंद्र मोहोड यांनी केली.