शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:54 AM2020-12-04T04:54:56+5:302020-12-04T04:54:56+5:30
बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकाला सततच्या पावसाचा ...
बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकाला सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी पिकांना मोठा खर्च लागला असून, पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे सडली आणि बोंडअळी आली. कपाशीच्या फुले, पात्यांची गळतीही मोठ्या प्रमाणात झाली. कीडरोगांपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर वेळोवेळी महागडी फवारणी केली. शेती मशागत, खते, फवारणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यात आला. अंदुरा, सोनाळा, बोरगाव वैराळे, दुधाळा, हातरूण, मालवाडा, शिंगोली, मांजरी, निमकर्दा शेतशिवरातील अचानक कापसावर बोंडअळी आली. त्यामुळे लावलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.