पळसाच्या पत्रावळय़ाची मागणी घटली

By admin | Published: May 21, 2014 12:10 AM2014-05-21T00:10:28+5:302014-05-21T00:27:35+5:30

थर्माकॉल व प्लास्टिकचा वापर वाढला

Demand for fleet collapses decreased | पळसाच्या पत्रावळय़ाची मागणी घटली

पळसाच्या पत्रावळय़ाची मागणी घटली

Next

मूर्तीजापूर : पूर्वी लग्नसमारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमानिमित्त दिल्या जाणार्‍या जेवणावळींमध्ये पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळय़ा व द्रोण यांचा वापर होत असे. अलीकडे मात्र प्लॉस्टिक व थर्माकॉलच्या पत्रावळय़ा आल्यामुळे पळसाच्या पत्रावळय़ा आता नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही बुडाली आहे. एकेकाळी पळसाच्या पत्रावळीची मागणी होत होती परंतु पत्रावळीची जागा प्लस्टिकने घेतली. लग्न समारंभात पूर्वी पाना-फुलांची सजावट असायची. मोहाची पाने किंवा पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण असायचे. आता मात्र पत्रावळी व द्रोणसुद्धा प्लॉस्टिकचेच वापरण्यात येत आहेत. कोणत्याही सजावटीसाठी थर्माकोलचा सर्रास वापर होतो. हे घटक पर्यावरणात पूर्णत: मिसळत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील ह्यवापरा आणि फेकाह्ण या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. पिण्यासाठी वापरलेले पाणी पाऊच, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, आईस्क्रिम कप, चायनिज फूड्ससाठी वापरण्यात येणारे प्लॉस्टिकचे चमचे या सर्वच माध्यमातून प्लॉस्टिकच्या वस्तूंचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असलेला दिसून येतो. याशिवाय स्वागत समारंभात वापरण्यात येणारे बुके प्लॉस्टिकच्या आवरणातच गुंडाळलेले असतात. प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्‍या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. आपल्या भागातही पूर्वी पत्रावळीतच जेवण व्हायचे. मात्र कालांतराने या पानांच्या पत्रावळींची जागा चकचकीत दिसणार्‍या प्लॉस्टिकच्या पत्रावळींनी घेतली आहे. प्लॉस्टिकचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ ह्यरेडीमेडह्णच्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे. कोणताही लग्न समारंभ आटोपल्यानंतर तेथे प्लॉस्टिकचा मोठा ढिगाराच तयार होतो. त्यामुळे लग्न समारंभातील प्लॉस्टिकचा वाढता वापर पर्यावरणास हानीकारक ठरत आहे.

Web Title: Demand for fleet collapses decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.