खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन
By रवी दामोदर | Published: March 3, 2024 04:36 PM2024-03-03T16:36:55+5:302024-03-03T16:37:26+5:30
खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खत व बियाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते.
अकोला : खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षांसाठी रासायनिक खतांचे नियोजन कृषी विभागाकडून सुरू आहे.यंदा शासनाकडे जिल्ह्यासाठी ९१ हजार ६८७ मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी जि.प कृषी विभागाकडून केली असून पुढील महिन्यात आवंटन मंजुरीची शक्यता आहे.
खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खत व बियाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते.अवघ्या दोन महिन्यांवर खरीप हंगाम येवून ठेपला असून काही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणीसुद्धा करतात.यासाठी कृषी विभागाकडून खतांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. गतवर्षी ८५ हजार ४३० मे टन खतांचे आवंटन मंजूर झाले होते.मात्र खरिपाच्या सुरुवातीला च युरिया व डीएपी चा तुटवडा आला होता. त्यामुळे यंदा गतवर्षी पेक्षा जास्त खतांची मागणी शासनाकडे केली आहे.दरम्यान बियाणे मागणीची कार्यवाही देखील कृषी विभागाकडून सुरू आहे.
अशी आहे खतांची मागणी
युरिया - २२३३६
डिएपी -१४९५४
एमओपी -३३१०
मिश्र खते - ३३०८५
एसएसपी -१८००२
एकूण-९१६८७