शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:20 AM2021-07-28T04:20:20+5:302021-07-28T04:20:20+5:30
--------------------- पथदिवे सुरू करण्याची मागणी पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांत रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत ...
---------------------
पथदिवे सुरू करण्याची मागणी
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांत रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन पथदिवे सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
------------------------
बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग
बाळापूर : शहरातील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा तुंबल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
--------------------
ग्रामपंचायत इमारती झाल्या शिकस्त
अकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. याच शिकस्त इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन ग्रामपंचायतींची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
------------------
सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
बाळापूर : गत आठवड्यात सतत पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील खिरपूरी, टाकळी खुरेशी, व्याळा, देगाव, नांदखेड शिवारात सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
------------------
लोणाग्रा परिसरात रस्त्यावर सांडपाणी
आगर : येथून जवळच असलेल्या लोणाग्रा ग्रामपंचायतकडून नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीज पुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त आहेत.
--------------------
बँकांकडून खरीप पीककर्ज वाटप संथगतीने
अकोला : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही ग्रामीण भागातील बँकांत पीककर्ज वाटपाचा वेग संथ आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असून, तातडीने पीककर्ज वाटप करणे गरजेचे आहे.
-----------------------
नांदखेड येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
बाळापूर : तालुक्यातील नांदखेड येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------
लोणाग्रा-हातरून रस्त्याची अवस्था वाईट
अकोला : लोणाग्रा ते हातरूण या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून, रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामनाकरीत मार्ग काढावा लागत आहे.
पावसामुळे अडचणी वाढल्या असून, रस्त्याची दुरुस्तीची मागणी होत आहे.
---------------------------------
वीजवाहिनीमुळे अपघाताचा धोका
तेल्हारा : तालुक्यातील ग्रामीण भागांत काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीजवाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर आहे. एखादवेळी वादळवाऱ्याने ही वाहिनी तुटल्यास धोका आहे.
-------------------------------------
फलकाअभावी चालकांची दिशाभूल
रोहणखेड : रोहणखेड ते अकोट मार्ग हा वळण मार्ग असल्याने या मार्गावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे चालकांत संभ्रम निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.