वृत्तपत्र विक्रेत्यांना मानधन, मोफत रेशन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:07+5:302021-04-24T04:18:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मूर्तिजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांसह किरकोळ व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे संकट वाढतच असून, नागरिकांची चिंता वाढली आहे. अशाही परिस्थितीत वृत्तपत्र विक्रेता दररोज आपले कर्तव्य निभावतो आहे; मात्र ‘लॉकडाऊन’मुळे वृत्तपत्र विक्रेतेही संकटात सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना अर्थसहाय्य करुन मोफत रेशनचे वाटप करावे, तसेच ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी मूर्तिजापूर ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी प्रा. एल. डी. सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढत असतानाच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तसेच आरोग्य यंत्रणाही कोलमडली आहे. अशा परिस्थितीतही वृत्तपत्र विक्रेता स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाकडून कोणतीही सुविधा मिळत नाही. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांना अर्थसहाय्य करून मोफत रेशनचे वाटप करावे तसेच ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी मूर्तिजापूर ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी प्रा. एल. डी. सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.