माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:42+5:302021-09-07T04:23:42+5:30
मूर्तिजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल, मापाडी संघटनेची सभा संपन्न झाली. यावेळी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात ...
मूर्तिजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल, मापाडी संघटनेची सभा संपन्न झाली. यावेळी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी हमाल व कामगारांनी केली आहे. तसेच संघटनेच्यावतीने डॉ. हरिश धूरट यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाचे संघटक शेख हसन कादरी, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हसन चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
मूर्तिजापूर राष्ट्रीय कष्टकरी पंचायतचे कार्याध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अब्दुल कय्यूम शेख महेबूब यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निज़ामुद्दीन ललकार उपस्थित होते. माथाडी, कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अ. कय्यूम शे. महेबूब संचालक व हमाल, मापाडी, नासिरोद्दीन, आनंदा शगोवेकर, राजेश प्रल्हाद खंडारे, मो. कासीद, अ. सादीक, अ. नाज़ीम, दिलीप राऊत, अ. रशीद, अ. अनीस, जमील चाऊस, अ. अजीज, तसव्वर खान, सद्दाम पटेल, मजहरुद्दीन माज़, अ. मुजाहिद, सै. अनवर, आदी उपस्थित होते.
----------------
अन्यथा आंदोलन...
सभेत माथाडी कायदा अंमलबजावणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कामगारांची आहे. त्यापैकी काही कामगारांना निलंबित करण्यासंबंधी बाजार समितीने भूमिका घेतली असून, त्यास विरोध करण्यात येईल, असे डॉ. हरिश धुरट यांनी सभेत सांगितले.