अकोट शहरातील जलवाहिनीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:48+5:302021-06-22T04:13:48+5:30
अकोट : अकोट शहरातील वाढीव पाणीपुरवठासाठी जलवाहिनी टाकण्यावर प्रहार संघटनेच्या सुशील पुंडकर यांनी आक्षेप घेतला आहे. कामातील त्रुटी व ...
अकोट : अकोट शहरातील वाढीव पाणीपुरवठासाठी जलवाहिनी टाकण्यावर प्रहार संघटनेच्या सुशील पुंडकर यांनी आक्षेप घेतला आहे. कामातील त्रुटी व दर्जाबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, जलवाहिनी कामाची ई-निविदा प्रक्रिया करतेवेळी शासन निर्णय व परिपत्रक पायमल्ली करण्यात आली. अंदाज पत्रकानुसार काम न करता मोजमाप पुस्तिकेत इंजिनिअर व अधिकारी यांचे संगनमत करून काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सदरच्या अंदाजपत्रकामध्ये होत कामासाठी एक मीटर ठरवून दिले असता एक फूट नाली करून पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शहरांमध्ये झालेले रस्ते नाली फ्लेवर बॉक्सचे नवीन तसेच जुने कामे काम करतेवेळी जेसीबीने न करता ब्रेकरने केले असते, तर नगरपालिका प्रशासनाने नुकसान झाले नसते, जलवाहिनीचे काम करताना जुनी जलवाहिनी फोडल्यामुळे नाल्यामधील दूषित पाणी नागरिकांना मिळाल्यामुळे कोरोनाकाळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करून योग्य कारवाई करून कामाची चौकशी आम्हाला विश्वासात घेऊन करावी, अशी मागणी प्रहारसेवक सुशील पुंडकर यांनी केली आहे.