घरगुती व कृषी वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:51+5:302021-06-03T04:14:51+5:30

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे! मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील ६० वर्षे वयावरील सर्व नागरिक व ४५ वय वर्षांवरील ...

Demand not to disconnect domestic and agricultural electricity | घरगुती व कृषी वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी

घरगुती व कृषी वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी

Next

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे!

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील ६० वर्षे वयावरील सर्व नागरिक व ४५ वय वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश असून, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले .

दाेनवाडा येथे काेराेना तपासणी माेहीम

म्हाताेडी : येथून जवळच असलेल्या दाेनवाडा येथे २ जून राेजी काेराेना आरटीपीसीआर तपासणी माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेत दाेन महिला, २० पुरुषांची तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच ज्याेती झटाले व श्रीकृष्ण झटाले, म्हाताेडी उपकेंद्राचे सीएचओ डाॅ.काळे, सुपरवायझर हिवराळे, कर्मचारी श्रीमती बाेरघरे, निनाेरे, श्रीमती शेवणे, तलाठी हिवरखेडे, ग्रामसेवक इंगाेले उपस्थित होते.

पातूर तालुक्यातील नागरिकांना रेशनची प्रतीक्षा

पातूर : तालुक्यातील गोरगरीब जनतेला रेशनचे धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने ऑनलाईनची नवीन पद्धत सुरु केली असून ऑनलाईन करण्यास विलंब होत आहे. कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळाले नाही.

पशु-पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था

वणी रंभापूर : सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, दरम्यान, जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, पाणी नसल्याने भटकंती होत आहे. पशू व पक्ष्यांची तहान, भूक भागविण्यासाठी पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम राबविला जात आहे.

मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दयनीय अवस्था!

मूर्तिजापूर : कारंजा लाड या मार्गाला जोडणाऱ्या मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

चारमोळी येथील तलाव करण्याची मागणी

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चारमोळी येथे तलाव करण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. चारमोळी येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, पातूर तालुक्यातील चारमोळी हे गाव जिल्ह्याच्या सीमेवर असून, निसर्गाच्या सान्निध्यात आहे. येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

Web Title: Demand not to disconnect domestic and agricultural electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.