निर्माणाधीन रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:26+5:302020-12-30T04:25:26+5:30
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. ते दिग्रस खुर्द निर्माणधीन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ...
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. ते दिग्रस खुर्द निर्माणधीन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळ्या मातीऐवजी दर्जेदार मुरूम टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दिग्रस बु. बसस्थानक ते दिग्रस खुर्द बसस्थानकापर्यंतचा एकूण २.४ किमी रस्ता होत असून, हा रस्ता गाळ वाट असलेल्या ठिकाणावरून होत आहे. हा रस्ता गाळ वाट असल्याने अगोदरच काळी माती आहे. पुन्हा हा रस्ता निर्माण होत असताना बाजूला खड्ड्यातील माती काढून त्या रस्त्याच्या काठावर मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही माती केव्हाही वाहत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच रस्त्यावर एखादे वाहन रस्त्याखाली गेल्यास ते केव्हाही खाली जाऊन फसू शकते. परिणामी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी निर्माणाधीन दिग्रस बु ते दिग्रस खुर्द रस्ता हा दर्जेदार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळ्या मातीऐवजी मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी माजी उपसरपंच मनोज गवई, दिग्रस खुर्दचे मंगेश इंगळे, धीरज गवई, सुहास गवई, वाहनचालक, ग्रामस्थ व दोन्ही गावातील युवकांकडून होत आहे.
.............................
निर्माणाधीन रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळ्या मातीऐवजी मुरूम टाकला तर रस्ता मजबूत होईल. हा रस्ता जास्त काळ टिकू शकते. तरी सबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा रस्ता योग्य बनविण्यात यावा.
जीवन उपर्वट, दिग्रस खुर्द