खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:05+5:302020-12-17T04:44:05+5:30

निवेदनात, खासगी शिकवणी वर्गांवर उपजीविका करणाऱ्या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील इतर घटकांना नियम व शर्तींच्या ...

Demand for private tuition classes | खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी

खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी

Next

निवेदनात, खासगी शिकवणी वर्गांवर उपजीविका करणाऱ्या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील इतर घटकांना नियम व शर्तींच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार करण्यास परवानगी दिली. त्याच प्रमाणे खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी. उच्चशिक्षित, पदवीधर तरुण, तरुणींनी शासकीय नोकरीच्या मागे न लागता, स्वबळावर खासगी शिकवणी वर्ग सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने धार्मिक स्थळांसोबतच, दारूची दुकाने, व्यायाम शाळांना परवानगी दिली आहे; परंतु खासगी शिकवणी वर्गांकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत खासगी शिकवणी वर्गांचे मोठे योगदान आहे. शिकवणी वर्गांच्या भरवशावर लॉजिंग, बोर्डींग, भोजनालयेसुद्धा बंद आहेत. तेथील कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे शासनाने खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रायव्हेट टीचर्स असोसिएशनचे प्रा. नितीन बाठे, प्रा. मुकूंद पाध्ये, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. अजरांबर गावंडे, प्रा. संतोष कुटे, प्रा. गोपाल गावंडे, किशोर पारखे, प्रा. प्रकाश डवले, प्रा. वसीम चौधरी, प्रा. विवेक शास्त्रकार, आष्टुलकर, प्रा. जयस्वाल, प्रा. अजय कुटे, प्रा. रत्नपारखी, प्रा. हरिश बुंदेले, योगेश जोशी, प्रा. शिवशंकर खोटरे, प्रा. भालचंद्र सुर्वे, प्रा. पुरुषोत्तम सुर्वे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

फोटो:

Web Title: Demand for private tuition classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.