मोर्णा कालव्याला पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:31 AM2020-12-05T04:31:14+5:302020-12-05T04:31:14+5:30
यंदा खानापूर, आस्टूल, पास्टूल, कोठारी, आगीखेड, पाडी शेतशिवारात जवळपास ५० टक्के गव्हाची पेरणीही झाली आहे. यावर्षी हरभऱ्याचे पेऱ्यात घट ...
Next
यंदा खानापूर, आस्टूल, पास्टूल, कोठारी, आगीखेड, पाडी शेतशिवारात जवळपास ५० टक्के गव्हाची पेरणीही झाली आहे. यावर्षी हरभऱ्याचे पेऱ्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीला जेमतेम २५ डिसेंबरच्या दरम्यान कालव्याला पाणी सोडल्या जात असते; मात्र यंदा गव्हाच्या पेरणीचा कालावधी पाहता कालव्याला पाणी सोडणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत थंडीचा जोर वाढल्याने गव्हाला पोषक ठरणार आहे. मोर्णा कालव्याच्या पाण्यावर परिसरातील शेकडो हेक्टर शेती अवलंबून आहे. त्याकरिता कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.