पाइपलाइनची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:50+5:302021-05-01T04:17:50+5:30
जठारपेठेत चौकात ट्रॅफिक जाम अकोला : जठारपेठ चौकासह राऊतवाडी, उमरी नाका मार्गावर भाजीविक्रेते, फुटपाथ विक्रेते दुकाने थाटत असल्याने खरेदीसाठी ...
जठारपेठेत चौकात ट्रॅफिक जाम
अकोला : जठारपेठ चौकासह राऊतवाडी, उमरी नाका मार्गावर भाजीविक्रेते, फुटपाथ विक्रेते दुकाने थाटत असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. रस्त्यावरच हातगाडी लावत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही रस्त्यांवरील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दिवेकर चौकातील पोलीस चौकी बेवारस
अकोला : वर्षभरापूर्वी दादासाहेब दिवेकर चौक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली; परंतु पोलीस चौकीमध्ये एकही पोलीस कर्मचारी तैनात नसताे. परिसरात सकाळी व दुपारच्या सुमारास गर्दी होते; परंतु त्याकडे एकही पोलीस कर्मचारी लक्ष देत नाही. सद्य:स्थितीत पोलीस चौकी बेवारस असल्याचे दिसून येत आहे.
मोकाट गुरांमुळे वाहनचालक त्रस्त
अकोला : शहरातील प्रमुख मार्गांवर मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. पशुपालक गुरांना मोकाट सोडून देतात. ही गुरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने, वाहतुकीस अडथळा होत आहे. गुरांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, महापालिका प्रशासनाने गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वाल्मीकी सेनेच्या वतीने दररोज अन्नदान
अकोला : गत काही दिवसांपासून संचारबंदीमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. गोरगरीब, निराधार, निराश्रितांसह रुग्णालयांमधील नातेवाइकांना जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत वाल्मीकी सेना मदतीला धावून आली आहे. शहरात चारचाकी वाहनांद्वारे फिरून दररोज गोरगरिबांना दोन क्विंटल अन्नदान करण्यात येत आहे. खिचडीसह भाजी-पोळीचे वितरण कार्यकर्ते करीत आहेत.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान
अकोला : कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून अनेक जण सेवा देत आहेत. लसीकरण मोहिमेत आरोग्य अधिकारी, कर्मचारी सेवा देत आहेत. अशा कोरोना योद्ध्यांचा श्रीराम नवमी समिती व जानकीवल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने हरीहरपेठ येथे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात सन्मान करण्यात आला. कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, नगरसेवक गिरीश जोशी, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ. अभय जैन, अनिल मानधने, संजय गोटफोडे आदी उपस्थित होते.
मारवाडी युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिर
अकोला : अ.भा. मारवाडी युवा मंचच्या वतीने लसीकरणापूर्वी युवकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात रक्ताची कमतरता भासत आहे. अग्रसेन भवन ट्रस्ट व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिरात युवकांनी रक्तदान करावे. शिबिर सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अग्रसेन भवन, राधाकिसन प्लॉट येथे होणार आहे.