काळवीट मृत्यू प्रकरणात गोवणाऱ्या वनविभागाच्या आरएफओ कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:18+5:302021-03-10T04:19:18+5:30
निवेदनानुसार त्यांची सून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आली. त्यानंतर सरपंचपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने त्यांच्या सुनेची ...
निवेदनानुसार त्यांची सून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आली. त्यानंतर सरपंचपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने त्यांच्या सुनेची सरपंचपदी निवड झाली. याचाच द्वेष मनात धरून काही लोकांनी वनविभागाला माझ्या शेतात काळवीट शॉक लागून दगावल्याची खोटी तक्रार १३ फेब्रुवारी २०२१ रोजी केली. त्यानंतर तब्बल ६ ते ७ दिवसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन पोलीसपाटलांना, दिनकर बेंडे यांच्या शेतात विजेचा धक्का लागून काळवीट दगावल्याचे सांगितले. याबाबत पोलीसपाटील यांनी माहिती नसल्याचे सांगितले. एवढेच काय तर गावातील ग्रामस्थ, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी यांनाही याबाबत माहिती नव्हती. वनविभागाच्या म्हणण्यानुसार १३ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता काळविटाचा मृत्यू झाला. परंतु त्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मी शेतात होतो. असा दावा शेतकरी दिनकर बेंडे यांनी केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री ८. ३० वाजता प्रकरणाचा पंचनामा करून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव कायद्यानुसार गुन्हे दाखल केला आणि सात दिवसांनंतर त्यांना अकोला येथील कार्यालयात बोलावून अटक केली. आरएफओ आर. एन. ओवे यांनी राजकीय दबावातून, कुठलीही चौकशी न करता या प्रकरणात अडकविल्याचा आरोप केला आहे.