सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:36+5:302021-04-18T04:18:36+5:30
-------------------- नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत नया अंदुरा : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड ...
--------------------
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
नया अंदुरा : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराची प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना त्वरित दोन लाखांच्या आतील कर्जमाफीसह पन्नास हजारांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तत्काळ खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
एप्रिल २०२० पर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून वर्ग होणार होते; परंतु नया अंदुरा, कारंजा रमजानपूर, हाता, अंदुरा, शिंगोली, निंबा फाटा, कवठा, बहादुरा, मोखा, काजीखेड, सागद, जानोरी, मोरगाव, निंबी, परिसरातील शेतकरी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अघापही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदान जमा न झाल्याने परिसरातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत.