वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:30+5:302021-04-22T04:18:30+5:30
वीज पुरवठा खंडित होत असल्याने गोरगरीब जनतेच्या घरातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकलचे उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपकेंद्र अंतर्गत ...
वीज पुरवठा खंडित होत असल्याने गोरगरीब जनतेच्या घरातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकलचे उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपकेंद्र अंतर्गत तुलंगा बु, तुलंगा खु, लावखेड, सांगोळा, निमखेड, दिग्रस बु, दिग्रस खु. आदी गावे येतात. या गावांसाठी वीज पुरवठा सुरळीत सुरू राहावा. यासाठी सस्तीऐवजी तुलंगा बु. येथे मिनी विद्युत सबस्टेशन देण्यात यावे. सबस्टेशन मिळाले तर वीज ग्राहकांसह कृषी पंप धारक शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. अशी मागणी १९ एप्रिल रोजी ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु. व ग्रामीण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांच्या नेतृत्वात मंगळवारी उपकार्यकारी अभियंता पातुर ग्रामीण प्रभारी आखरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख मुकेश हातोले, पंकज हातोले, संदीप अळसकार, अजय देशमुख उपस्थित होते.