कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना विशेष वैद्यकीय रजा लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:32+5:302020-12-17T04:43:32+5:30
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शासनास सादर केलेल्या निवेदनानुसार कोरोना आजारातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाॅझिटिव्ह झाल्यानंतर ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शासनास सादर केलेल्या निवेदनानुसार कोरोना आजारातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाॅझिटिव्ह झाल्यानंतर वैद्यकीय उपचारार्थ कोविड दवाखान्यात भरती होणे, आजार सौम्य असल्यास किंवा आजारातून निगेटिव्ह झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत गृहविलगीकरण कालावधी दिला जाणे, याकरिता संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा घेणे गरजेचे असते. असे निवेदनात नमूद म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यास त्याच्या खात्यावर अर्जित रजा नसल्यास असाधारण रजा (विनावेतन रजा) घ्यावी लागते. कोरोना आजारासाठी रजा घेणे संबंधित कर्मचाऱ्यांची वैयक्तिक गरज नसून ती रजा प्रशासनाने लादलेली रजा आहे. कारण कोरोना आजार नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष वैद्यकीय रजा लागू करण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन गंभीर आजारांच्या यादीमध्ये नोंद करण्यात यावी. त्याचे सर्व फायदे लागू करण्यात यावे, अशी मागणी विमाशिसंघाने निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करतेवेळी विमाशिचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर, संघटक हर्षवर्धन देशमुख, हरिश्चंद्र वडूरकर, अजय जोशी, बी.टी. जाधव, राजेंद्र ढाकरे, अभिजित देशमुख आदी विमाशिचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.