शुभेच्छा पत्रांची मागणी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:37+5:302021-08-29T04:20:37+5:30
०------------------ नया अंदुरा येथे व्हायरल फीव्हरची साथ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नया अंदुरा : वातावरणात झालेल्या बदलांमुळे नया अंदुरा येथे ...
०------------------
नया अंदुरा येथे व्हायरल फीव्हरची साथ;
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नया अंदुरा : वातावरणात झालेल्या बदलांमुळे नया अंदुरा येथे साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, ताप, सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, गुडघे दुखणे आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाने दखल घेऊन घरोघरी जात नमुने घेऊन तपासणी करण्याची मागणी होत आहे. उरळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नया अंदुरा येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नया अंदुरा येथे गत १२ दिवसांपासून साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, प्रत्येक घरात रुग्ण आढळून येत आहे. तसेच खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. उरळ येथील आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नया अंदुरा येथे आरोग्य विभागाने नमुने घेऊन साथरोगांवर नियंत्रण ठेवावे, अशी नया अंदुरा येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.
---------------------------
नया अंदुरा येथे व्हायरल फीव्हरची साथ वाढत असल्याने तसेच लहान मुलांच्या रुणसंख्यात वाढ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन नमुने घेणे गरजेचे आहे.
- संकेत बकाल, नया अंदुरा
------------------------
म्हातोडी येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण
म्हातोडी : येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. येथील एका युवकास ताप आल्यानंतर अकोल्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. त्याची रक्ताची तपासणी केली असता डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गावात गटारांचे साम्राज्य असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.