ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:08+5:302020-12-12T04:35:08+5:30
आगर: अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे; मात्र अद्यापही परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बससेवा ...
आगर: अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे; मात्र अद्यापही परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातही बससेवा सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त!
चिखलगाव : परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव हाेत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने सिंचन करताना शेतकऱ्यांना त्रास हाेत आहे. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था!
वाडेगाव : परिसरातील वाडेगाव, देगाव परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच शासनाचा लाखाे रुपयांचा महसूलही बुडत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
गहू, हरभरा पिकाची पेरणी आटाेपली!
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली असून, अनेकांची गहू, हरभरा पिकाची पेरणी पूर्ण केली आहे. खरीप पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकाकडून आशा आहेत. तसेच पाणी उपलब्ध असल्याने सिंचनात वाढ हाेणार आहे.
आत्मनिर्भर याेजनेचा लाभ देण्याची मागणी
बार्शीटाकळी : केंद्र शासनाच्या वतीने फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर भारत याेजनेंतर्गत १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. शहरातील अनेक फेरीवाल्यांना अद्यापही या याेजनेचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. याकडे नगर पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
वाडेगावात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा!
वाडेगाव : येथील बाजारात व बाळापूर तालुक्यातील तालुक्यात बहुतांश ग्रामीण भागात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे.
व्हायरल फिव्हरची साथ; ग्रामस्थ त्रस्त!
अडगाव: गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खाेकल्याचा त्रास हाेत आहे. काेराेनाची लक्षणे असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आराेग्य विभागाने उपाययाेजना करण्याची गरज आहे.
रस्त्यावरील मास्क विक्री ठरतेय धाेकादायक!
अकोट: शहरातील विविध भागात मास्कची रस्त्यावरच विक्री करण्यात येत आहे. मास्कची अनेकजण ट्रायल करून पाहत असल्याने काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे. तसेच अनेक जण मास्कची विक्री अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत असल्याचे चित्र शहरात आहे.
ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रकोप!
मुंडगाव: गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पाेखरणाऱ्या अळ्यांनी आक्रमण केले आहे. खरीप हंगामात मूग, उडीद आणि साेयाबीनचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.