मेळघाट पर्यटन सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:58+5:302021-06-26T04:14:58+5:30

अकोटः मेळघाटातील जिप्सी चालक-मालक, गाइड संघटना व मेळघाट वॉच फाउंडेशनतर्फे मुख्य वनसंरक्षक, अमरावती व प्रधान मुख्य वनरक्षक, नागपूर यांना ...

Demand to start Melghat tourism | मेळघाट पर्यटन सुरू करण्याची मागणी

मेळघाट पर्यटन सुरू करण्याची मागणी

googlenewsNext

अकोटः मेळघाटातील जिप्सी चालक-मालक, गाइड संघटना व मेळघाट वॉच फाउंडेशनतर्फे मुख्य वनसंरक्षक, अमरावती व प्रधान मुख्य वनरक्षक, नागपूर यांना निवेदन देऊन मेळघाट पर्यटन सुरू करण्याची मागणी केली आहे.

राज्यात ‘अनलॉक’ प्रक्रियेत सर्वच व्यवसाय सुरू होत आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठलीही सवलत नसल्याने, पेट्रोलच्या भावात वाढ झाल्याने जिप्सी भाड्यात वाढ करण्याची मागणी मेळघाट वॉच फाउंडेशनचे रोहित पुंडकर यांनी केली.

त्यावर मुख्य वनसंरक्षक श्रीमती ज्योती बॅनर्जी यांनी पूर्ण सहकार्य करीत, येत्या सोमवारपर्यंत सकारात्मक भूमिका नॅशनल टायगर कंझर्वेशन अथॉरिटीकडे मांडून पूर्वरत पर्यटन सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रहारसेवक सुशील पुंडकर, शाहनूर ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मोतीलाल दारशिंबे, चेतन नाचणे, रवि पवार, चिखलदरा जिप्सी चालक-मालक संघटनाचे इबबू शाह, झाकीर सिद्दीक, सेमाडोहचे भोला मावस्कर, हरीसाल नीलेश वानखेडे, वासालीचे राम मावस्कार, सुमित पालकर, ज्ञान गंगाचे अंभोरे, फारुक शेख, रवि मावास्कर, सलमान खान व चिखलदरा, शहानूर, सेमादोह, हरीसाल, वसाली, ज्ञानगंगा, काटेपूर्णाचे समस्त सफारी गाइड व जिप्सी चालक-मालक उपस्थित होते.

Web Title: Demand to start Melghat tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.