नवथळ येथील सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:50+5:302021-01-03T04:19:50+5:30
गावात मंजूर झालेले सेवा केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नवथळ राजेंद्र ...
गावात मंजूर झालेले सेवा केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नवथळ राजेंद्र तेलगोटे यांनी गावात मंजूर झालेले सेतू केंद्र त्वरित सुरू करून जनतेचा त्रास दूर करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. त्यांच्या निवेदनाची दखल माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने घेतली असून, त्यांनी यासंदर्भात अकाेला जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित सेतू सेवा केंद्र बंद का आहे, याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्र विभागाच्या कक्ष अधिकारी मेगा भोगावकर यांनी अकोला जिल्हाधिकारी, तक्रारकर्त्यांना पाठविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी काय करतात, याकडे नवथळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
..... बॉक्स...
जिल्ह्यातील बहुतांश गावांत सेतू केंद्र मंजूर झाले आहे. परंतु काही गावांत सेतू केंद्र सुरू झालेले नाही. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे यासंदर्भात कुठलाही आदेश काढता येत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यासंदर्भात आपण योग्य चौकशी करून प्रलंबित असणारे सेतू केंद्र सुरू करण्याचे आदेश काढणार आहोत.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकाेला