वरुर-दिनोडा-अकोट बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:36 AM2021-02-21T04:36:28+5:302021-02-21T04:36:28+5:30

---------- उमरा परिसरात कांदा लागवडीस प्रारंभ उमरा: उमरा परिसरात दरवर्षी ३०० ते ४०० एकराच्या जवळपास कांद्याची लागवड करण्यात येते, ...

Demand to start Varur-Dinoda-Akot bus | वरुर-दिनोडा-अकोट बस सुरू करण्याची मागणी

वरुर-दिनोडा-अकोट बस सुरू करण्याची मागणी

Next

----------

उमरा परिसरात कांदा लागवडीस प्रारंभ

उमरा: उमरा परिसरात दरवर्षी ३०० ते ४०० एकराच्या जवळपास कांद्याची लागवड करण्यात येते, परंतु भूजल पातळी खालावल्याने या वर्षी कांदा लागवड अल्प प्रमाणात दिसत आहे. परिसरातील घटत्या पाणी पातळीचा फटका कांदा लागवडीला बसला आहे.

----------

शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

अडगाव: वन्य प्राण्यांनी पीक नुकसान केल्याबद्दल वन विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते, परंतु अद्याप पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही.

-----

चोहोट्टा येथे आठवडी बाजारात अस्वच्छता

चोहोट्टा बाजार: चोहोट्टा बाजार येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावांमधील व्यावसायिक, व्यापारी व ग्रामस्थ येतात. बाजार परिसरात कुजलेला भाजीपाला व इतर साहित्य फेकत असल्याने, सर्वत्र अस्वच्छता पसरत आहे.

------

हरभऱ्याच्या उत्पादनात घट

आलेगाव: हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. शेतकरी हरभरा पिकाची काढणी करीत आहेत. काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन होत आहे.

-----

लोंबकळणाऱ्या तारांमुळे मृत्यूला आमंत्रण

खेट्री: चतारी येथे आठ ते दहा घरांवरून लोंबकळणाऱ्या तार गेल्याने, अनेक वेळा शॉर्टसर्किट होऊन किरकोळ घटना घडल्या आहेत. मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत तार मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Demand to start Varur-Dinoda-Akot bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.