अवकाळी पावसामुळे नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:52+5:302021-03-25T04:18:52+5:30
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पातूर व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासनातर्फे नुकसानभरपाई म्हणून आर्थिक ...
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पातूर व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासनातर्फे नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी मुंबई येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन केली. पातूर तालुक्यातील परिसरात अचानक पणे आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फळबाग तसेच काढणीवर आलेल्या गहू , हरभरा , कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा आलेला घास हिरावला गेला आहे. लॉकडाऊन , कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यावेळी मनपा विरोधी पक्षनेता साजिद पठाण, महेंद्र गवई, पराग कांबळे, मो. युसूफ, पंकज देशमुख आदी उपस्थित होते.