पातूर - भंडारज रस्त्यासाठी अंडरपास देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:12+5:302021-04-16T04:18:12+5:30
खेट्री : सध्या अकोला-वाशिम-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर पातूर शहरानजिक पातूर - भंडारज रस्त्यासाठी अंडरपास देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे ...
खेट्री : सध्या अकोला-वाशिम-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर पातूर शहरानजिक पातूर - भंडारज रस्त्यासाठी अंडरपास देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे प्रवीण देशपांडे, पातूर पंचायत समितीचे माजी सभापती बालू ऊर्फ अनंत बगाडे, पुंडलिकराव आखरे, नाना अमानकर, मीराताई तायडे, श्रीकांत बराटे यांनी निवेदनाव्दारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
खासदार व केंद्रीय शिक्षा राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पातूर, भंडारज, तांदळी परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन पातूर-भंडारज या (व्हिडीआर) मार्गाला जिल्हा नियोजन समितीमधून मंजुरी मिळाली असून, या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पातूर - भंडारज रस्ता हा अकोला - हिंगोली ह्या राष्ट्रीय महामार्गाला छेदून जात असल्यामुळे ह्या रस्त्यावरील रहदारीसाठी राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास बांधण्यात यावा, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी भविष्यात असे व्हिडीआर, एमडीआर रोड होण्याची शक्यता असू शकते़ तिथेसुध्दा अशा अंडरपासचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे़. या निवेदनावर अकोला जिल्हा आत्मा समितीचे सदस्य प्रवीण देशपांडे, पातूर पंचायत समितीचे माजी सभापती बालू ऊर्फ अनंत बगाडे, पातूरच्या माजी नगराध्यक्ष मीराताई तायडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष पुंडलिकराव आखरे, समितीचे सदस्य नाना अमानकर, आत्मा समितीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बराटे, छगन कराळे, पांडुरंग राऊत, मंगेश भगत यांच्या सह्या आहेत.