सर्व वयोगटांतील पत्रकारांना कोविड लस देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:55+5:302021-04-06T04:17:55+5:30
तेल्हारा : राज्यातील सर्व वयोगटांतील पत्रकारांना कोविड -१९ ची लस द्यावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची ...
तेल्हारा : राज्यातील सर्व वयोगटांतील पत्रकारांना कोविड -१९ ची लस द्यावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्या करीत तेल्हारा तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिले आहे.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनानुसार, कोरोना काळात राज्यातील पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची मदत करण्याचे काम करीत अनेक पत्रकारांनी ‘फ्रंन्टलाईन वर्कर’ची भूमिका पार पाडली आहे. सामाजिक जबाबदारी पार पाडताना राज्यातील जवळपास ८०० पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली, तर ७८ पत्रकारांचा बळी गेला आहे. अशा स्थितीत पत्रकारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, तसेच उत्तराखंड राज्य सरकारने सर्व वयोगटांतील पत्रकारांना तातडीने कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघाचे सत्यशील सावरकर, प्रल्हादराव ठोकणे, सुरेश शिंगणारे, अनंत अहेरकर, कृष्णा फंदाट, राम फाटकर, सदानंद खारोडे, धर्मेश चौधरी, प्रशांत विखे, अनिल जोशी, नीलेश जवकार, अनिल अवताडे, राहुल मिटकरी, विद्याधर खुमकर, शुभम सोनटक्के, रवी शर्मा, दत्तात्रय बिहाडे, बसवेश्वर मिटकरी, अमित काकड, सुरेश सिसोदिया, विशाल नांदोकार, विलास बेलाडकर, आदी पत्रकारांनी केली आहे.