जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे लसीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:41+5:302021-03-24T04:16:41+5:30
महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस खात्यात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, आशा सेविका त्याप्रमाणे साठ वर्षांवरील सर्व ...
महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस खात्यात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, आशा सेविका त्याप्रमाणे साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक यांना शासनाकडून मोफत लस टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. परंतु गावपातळीवर कोरोना काळात महसूल व गृह विभागामार्फत प्राप्त आदेशाचे तंतोतंत पालन करत शासन व जनतेमधला दुवा म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील व दहीहांडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावचे पोलीस पाटील यांचे लसीकरण वगळता जिल्ह्यातील इतर गावच्या पोलीस पाटील यांना लस देण्यात आली नसल्याचे निदर्शनास येत आहे. गत वर्षांपासून संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पुरी यांच्या आदेशाचे, सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गावपातळीवर कायदा, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून लसीकरण कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करणारे गावपातळीवरील कोविड योद्धा बाळापूर उपविभागातील पोलीस पाटील लस घेण्यापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष निरंजन पारवे, गाव कामगार संघटनेचे जिल्हा सचिव अशोक तायडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.