गर्दी टाळण्यासाठी दोन ठिकाणी लसीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:32+5:302021-04-26T04:16:32+5:30
लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरळीत असतानाच, २३ एप्रिलपासून नगर परिषद अभ्यासिका डीपी रोड येथे सुरू करण्यात आले ...
लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरळीत असतानाच, २३ एप्रिलपासून नगर परिषद अभ्यासिका डीपी रोड येथे सुरू करण्यात आले आहे. पहिला आणि दुसरा डोस एकाच ठिकाणी देण्यात येत असल्याने येथे नागरिकांचा गोंधळ होत आहे. लसीकरणाची दोन ठिकाणे केली तर हा गोंधळ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. पहिल्या डोसकरिता नगर परिषद अभ्यासिका डीपीरोड व दुसऱ्या डोसकरिता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयत दिल्यास नागरिकांच्या सोयीचे होईल व गोंधळ होणार नाही. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना किमान ३० दिवस लसीकरण करता येत नाही. म्हणून प्रथम डोस असणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी प्रमाणपत्र असलेल्या लोकांनाच लसीकरणाची व्यवस्था करावी. यामुळे गर्दी कमी होईल व काम सोपे होईल. या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
फोटो: