एसटीच्या नोकरीतून काढण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:03 AM2020-06-26T10:03:12+5:302020-06-26T10:03:20+5:30
नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत तिला शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने त्याच्याच अधिनस्त असलेल्या एका महिला कर्मचाºयास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत तिला शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली, राज्य परिवहन महामंडळाच्या कौलखेड रोडवरील वर्कशॉपमध्ये आॅपरेटर सेक्शनमधील सहायक या पदावर कार्यरत अतुल पोजगे याने विनयभंग केल्याची तक्रार महिला कर्मचाºयाने खदान पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दिली. यातक्रारीवरून पोलिसांनी अधिकाºयाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, आरोपी अतुल पोजगे हा त्या महिला कर्मचाºयाचा कार्यालयात येता-जाता शारीरिक छळ करीत अश्लील चाळे करीत होता. एवढेच नव्हे तर ज्या सेक्शनचा तो महत्त्वाचा अधिकारी आहे त्या सेक्शनमधून नोकरीवरूनच काढून टाकण्याची धमकी देत या महिला कर्मचाºयास शारीरिक सुखाची मागणी करीत होता. या महिला कर्मचाºयास छळ असह्य झाल्यानंतर तिने अतुल पोजगे याने दिलेल्या शारीरिक त्रासाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली. यावरून खदान पोलिसांनी पोजगे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३५४ अ, नुसार गुन्हा दाखल केला आहे.
१८ दिवसांपासून छळ
परिवहन महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेला अतुल पोजगे याने त्याच्या अधिनस्त असलेल्या एका महिला कर्मचाºयाचा २ ते २० जून या १८ दिवसांमध्ये प्रचंड छळ केला असे तक्रारीत नमुद आहे. महिला तणावात आल्याने तिने या प्रकरणाची तक्रार २४ जून रोजी रात्री खदान पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपी अतुल पोजगे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.