टाइल्स चोरट्यांची कारागृहात रवानगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 09:54 PM2017-11-22T21:54:18+5:302017-11-22T21:59:37+5:30
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय बांधकामातील टाइल्स चोरी करणार्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या चोरट्यांची कारागृहात रवानगी केली. या तिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय बांधकामातील टाइल्स चोरी करणार्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या चोरट्यांची कारागृहात रवानगी केली. या तिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त केला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मागे शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामातील खोल्यांमध्ये तळावर टाइल्स बसविण्याचे कामकाज जोरात सुरू आहे. या टाइल्सच्या पेट्या याच परिसरात ठेवण्यात आलेल्या होत्या. रविवार, सोमवार या दोन दिवसांपासून दोन ते तीन पेट्या चोरण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. या माहितीवरून पोलीस कर्मचार्यांनी समाधान डिगांबर कांबळे (३0), सुधीर काशीराम शिरसाट (२७), प्रकाश किसन मसराम (३२) या तिघांना टाइल्स चोरी करताना रंगेहात अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांनी ६४ हजार रुपयांच्या टाइल्स जप्त केल्या. यासोबतच टाइल्स नेण्यासाठी वापरण्यात आलेला ऑटो क्र. एमएच ३0 पी ७६३२ किंमत ६0 हजार रुपयेही जप्त केला आहे. त्यानंतर रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले, न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.