महाविजयाचा संकल्प करीत महायुतीचे शक्तीप्रदर्शन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 04:57 PM2024-04-03T16:57:56+5:302024-04-03T16:58:46+5:30
४ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. भाजपतर्फे एक दिवस अगाेदर बुधवारी उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित झाल्यानंतर सकाळी ९ वाजतापासूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमाेरील भाजप कार्यालयासमाेेर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत आले हाेते.
अकाेला: महायुतीवे शक्तीप्रदर्शन करीत भाजपाचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी बुधवार,३ एप्रिल राेजी अकाेला लाेकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आकाश फुंडकर, अजित पवार गटाचे आमदार अमाेल मिटकरी, माजी मंत्री रणजीत पाटील, शिदेंसेनेचे माजी आमदार गाेपिकीशन बाजाेरिया उपस्थित हाेते. शेकडाे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत महायुतीतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
४ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. भाजपतर्फे एक दिवस अगाेदर बुधवारी उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित झाल्यानंतर सकाळी ९ वाजतापासूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमाेरील भाजप कार्यालयासमाेेर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत आले हाेते. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रॅलीला सुरूवात हाेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभेला सुरूवात झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनुप धाेत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला.
-विकासाची दृष्टी असलेला उमेदवार- फडणवीस
अकाेला लाेकसभा मतदार संघात यावर्षी तरूण उमेदवार अनुप धाेत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवले असून, ते विकासदृष्टी असलले उमेदवार आहे. देशाला पुढच्या पाच वर्षात आर्थिक महासत्ता करून देश व महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल असा दावा फडणवीस यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभा
भाजप कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीचे जिल्हाधकारी कार्यालय परिसरात सभेत रूपांतर झाले. सभेला महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची माेठ्या प्रमाणात उपस्थिती हाेती.