पत्रकार वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

By Atul.jaiswal | Published: February 12, 2024 07:15 PM2024-02-12T19:15:21+5:302024-02-12T19:19:28+5:30

दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची निवेदनातून केली मागणी

Demonstration in front of Mahatma Gandhi statue in Akola to protest the attack on journalists | पत्रकार वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

पत्रकार वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

अतुल जयस्वाल, अकोला: पत्रकार निखिल वागळे, ॲड.असीम सरोदे व डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व अकोलेकर नागरिकांतर्फे सोमवारी (१२ फेब्रुवारी) येथील गांधी- जवाहर बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे देण्यात आले. पत्रकार वागळे व सहकाऱ्यांवर गेल्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भर रस्त्यावर हल्ला करण्यात आला होता. याचा निषेध म्हणून अकोल्यातील नागरिकांनी धरणे आंदोलन केले.

दुपारी १२ वाजता धरणे आंदोलनाला बसलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत शासनाला निखिल वागळे व सहकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पाठविले. हल्ले करणाऱ्यांपेक्षा निर्भय बनो सभेच्या आयोजकांवर आणि हल्ला थांबविणाऱ्या अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेण्याची मागणीसुद्धा या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी विजय कौसल, सुभाष काशीद, विजय देशमुख, शंकरराव लंगोटे, पुरुषोत्तम आवारे, जावेद जकारिया, सुधाकर खुमकर, निखिलेश दिवेकर, सुभाष कोरपे, श्याम देशमुख, अविनाश देशमुख, सौ.सुषमा कावरे, नरेंद्र चिमणकर, ऍड.अनिल लव्हाळे, अमरदिप सदांशीव, गजानन हरने, प्रा.डॉ.गजानन वाकोडे, सौरभ वाघोडे, यशवंत चंदन, चंद्रकांत झटाले उपस्थित होते.

Web Title: Demonstration in front of Mahatma Gandhi statue in Akola to protest the attack on journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला