मातोश्री प्रतिष्ठानने केली निदर्शने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:16 AM2021-07-17T04:16:02+5:302021-07-17T04:16:02+5:30
अकोला: कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात (फी) ५० टक्के सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी ...
अकोला: कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात (फी) ५० टक्के सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
कोरोना संकटाच्या परिस्थितीत अनेक लोकांचे रोजगार गेले असून, अनेक जण बेरोजगार झाले असून, पालकांना मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी, तसेच कोरोना काळातील २०२०-२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांना मोफत शिक्षण देण्याची मागणी करीत मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश ढोरे यांच्यासह गोपाल जोगदंड, पंकज बाजोड, खुशाल जैन, दीपक काटे, प्रमोद इंगळे, शुभम वाकोडे, ऋत्विक शिरसाट, सागर श्रीवास्तव, भूषण शेळके, मुन्ना महाजन, अभिषेक वानखडे, मयूर सरप, रंजित राजगुरू, पंकज फुलकर, सचिन लोखंडे, अमर तिवारी आदी उपस्थित होते.
.................फोटो...................