मनात्री गावात आढळला डेंग्यूचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:59 PM2017-09-06T19:59:23+5:302017-09-06T19:59:29+5:30
पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले मनात्री गावामध्ये तापीने थैमान घातले असून एकाला डेंग्यूने ग्रासले आहे. तो सध्या अकोला येथे उपचार चालू असून पंचगव्हाण डॉ क्टरांचे दुर्लक्ष होत आहे.
Next
ठळक मुद्देमनात्री गावात साथीचे थैमान अकोला येथे उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मनात्री : पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले मनात्री गावामध्ये तापीने थैमान घातले असून एकाला डेंग्यूने ग्रासले आहे. तो सध्या अकोला येथे उपचार चालू असून पंचगव्हाण डॉ क्टरांचे दुर्लक्ष होत आहे. मनात्री येथील सोहेल राजू वाघमारे वय ३ हा डेंग्यू रुग्ण आढळल्याचे अकोला डॉक्टरांनी सांगितले. तसेच गावामध्ये रुकमा रामा वानखडे हे आजी असून तापीने ग्रासले आहे. पण डॉक्टर गावामध्ये येऊनही पाहत नाही. तरी वेळेवर तपासणी व्हावी आणि उपचार व्हावे, अशी गावकर्यांची मागणी आहे.