‘एसीसी’चा नकार; गणेशमूर्ती व्यावसायिकांनी थाटली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:28+5:302021-09-09T04:24:28+5:30
गणेशाेत्सवादरम्यान शहराच्या विविध भागात गणेशमूर्तींची विक्री करणारे व्यावसायिक दुकाने थाटतात. यामध्ये बाहेरगावच्या व्यावसायिकांचा माेठा भरणा दिसून येताे. २०१५ पर्यंत ...
गणेशाेत्सवादरम्यान शहराच्या विविध भागात गणेशमूर्तींची विक्री करणारे व्यावसायिक दुकाने थाटतात. यामध्ये बाहेरगावच्या व्यावसायिकांचा माेठा भरणा दिसून येताे. २०१५ पर्यंत शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख चाैकांमध्ये दुकाने थाटली जात हाेती. परंतु, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण हाेत असल्याचे पाहून तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी स्थानिक अकाेला क्रिकेट क्लब मैदानात मूर्ती व्यावसायिकांचे स्थानांतरण केले. तसेच रस्त्यालगत व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला हाेता. तेव्हापासून ‘एसीसी’ मैदानावर गणेशमूर्तींची विक्री केली जाते. यावर्षी ‘एसीसी’ व्यवस्थापनाने मूर्ती व्यावसायिक मैदानात घाण, केरकचरा करून मैदानाची दुरवस्था करीत असल्याचे नमूद करीत जागा उपलब्ध करून देण्यास असमर्थ असल्याचे प्रशासनाकडे नमूद केले, तर दुसरीकडे मैदानावर व्यावसायिकांनी दुकाने उभारल्याचे पाहावयास मिळाले.
मैदानाची साफसफाई का नाही?
‘एसीसी’मैदानावर गणेशमूर्तींची दुकाने थाटण्यास हरकत नाही. परंतु, पावसामुळे निर्माण हाेणारा चिखल व व्यावसायिकांकडून घाण व अस्वच्छता पसरविली जात असल्याचे दिसून येते. हा व्यवसाय आटाेपल्यानंतर मनपा प्रशासनाकडून मैदानाची साफसफाई करण्याकडे पाठ फिरवली जाते. व्यावसायिकांकडून शुल्क वसूल करणाऱ्या मनपाकडून साफसफाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित हाेताे.