अनुदानावरील बियाण्यांसाठी कृषी विभागाने मुदत वाढविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:33+5:302021-05-14T04:18:33+5:30
बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी सातबारा, आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड, आदी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. ...
बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी सातबारा, आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड, आदी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यातही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यास ओटीपीद्वारे रजिस्ट्रेशन होणार आहे, तर इतरांचे थम्बद्वारे करता येणार असून फक्त एक बॅगेवरील ५० टक्के या तोकड्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करून लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन नोंदणी करण्याची सक्ती कृषी विभागाने केली आहे. परंतु, कोरोनामुळे लागू लॉकडाऊन, सेतू केंद्र बंद असल्यामुळे ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. मुदत कमी दिवसांची असल्यामुळे नोंदणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करताच, कृषी विभागाने ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत वाढवून २० मे केली आहे.
Photo from Anil Girhe लोकमत वृत्ताची दखल
बियाणे अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी तारखेत वाढ
एक बॅग बियाणे अनुदानासाठी शेतकऱ्याचा जीव टांगणीला या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रकाशित झाले. अर्ज करण्याची दि. १५ मे ची शेवटची तारीख होती. या लाॅकडाऊनमध्ये शेतकरी यांना कशा प्रकारे तारेवरची कसरत करावी लागणार याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित होताच कृषी विभागाकडून आणखी पाच दिवसांची मुदतवाढ करून २० तारीख शेवटची ठेवली आहे. या बातमीमुळे सामान्य शेतकरी यांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.