कृषी विभागाचे कामकाज आता ‘ऑनलाईन’वर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:07 PM2020-03-29T16:07:58+5:302020-03-29T16:12:20+5:30
राज्यातील कृषी विभागाचे कामकाज आता मोबाईल,आॅनलाईन केले जात आहे.
अकोला: कोरोना विषाणूचा दोन हात करण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असून, दक्षता घेतली जात आहे.संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे.या स्थितीत महत्वाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाच्या कामकाजावर परिणाम होवूू नये म्हणूून दक्षता घेतली जात आहे.राज्यातील कृषी विभागाचे कामकाज आता मोबाईल,आॅनलाईन केले जात आहे. कोरामुुळे बहुतांश कार्यालयात मणुष्यबळाची संख्या कमी करण्यात आली आहे.कार्यालये ओस पडलेली दिसतात.तथापि कृषी विभागाचे कामकाज सुरू आहे.बैठका, दौरे रद्द करण्यात आल्याने कृषी आयुक्त सुहास दिवसे हे दररोज राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा,व्हिडीओे कॉन्फ्रसिंग,व्हॉअसअॅपव्दारे घेत आहेत. विभागीय सहसंचालक, कृषी आयु्क्ततालयाचे संंचालक,यांच्यासोबत दररोज संंपर्क साधून सुचना दिल्या जात आहेत.मार्च माहिण्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने कृषी विभागाच्या योजना व इतर सर्वच कामाची लगबग बघायला मिळते आता कार्यालयात तसे चित्र नसले तरी कृषी विभागाला प्राप्त निधी व त्याचे नियोजन केले जात आहे. मार्च महिना संपत आला असून, येत्या खरीप हंगामाचे नियोजही करायचे आहे.एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री खरीप नियोजनाची बैठक घेत असतात.तसेच खरीप पेरणीपूूर्व मेळावे,असे अनेक कार्यक्रम कृषी विभागासमोर आहेत.तथापि यावर्षी ही सर्र्व कामे करण्यास कृषी विभागाला पुरेसा मिळणार नसल्याचे एकूण चित्र आहे. सद्या कोरानाचा सामना करण्यासाठी सर्वजण लढा देत असल्याने या नियोजनासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयाची प्रतीक्षा करावी लागेल.
कृषी विभागाचा आढावा वरिष्ठ स्तरावरू न घेतला जात असून, नियोजनाप्रमाणे जिल्हयातील कृषी अधिकाऱ्यांना आॅनलाईल,व्हॉटसअॅपव्दारे सुचना दिल्या जात आहेत. जिल्हा पातळीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे विभागीय,तालुका कृषी अधिकाºयांना सुचना देण्यात येत आहेत.खरीपाचे नियोजन सुचनेप्रमाणे केले जाणार आहे.
- मोेहन वाघ,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,अकोला.