संत वासुदेव महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:14 AM2021-07-19T04:14:15+5:302021-07-19T04:14:15+5:30
श्रद्धा सागरमध्ये सुरू असलेल्या ‘श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवात ‘श्रीं’चा अभिषेक करून वारकरी सांप्रदायिक भजन झाले. त्यानंतर, अमरावती येथील जिल्हाधिकाऱ्यांनी निवड ...
श्रद्धा सागरमध्ये सुरू असलेल्या ‘श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवात ‘श्रीं’चा अभिषेक करून वारकरी सांप्रदायिक भजन झाले. त्यानंतर, अमरावती येथील जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केल्यानुसार, संस्थाध्यक्ष श्री हभप वासुदेवराव महाराज महल्ले यांनी ‘श्रीं’च्या पादुकांचे पूजन करून पादुकांना वाहनांत स्थानापन्न केले. श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून सकाळी ८ वाजता ‘श्रीं’च्या पादुका श्री क्षेत्र कौंडण्यपूरकडे रवाना झाल्या आहेत. तेथे श्री रुक्मिणी देवींच्या पालखीसोबत सर्व संतांच्या पादुकांचे पूजन होऊन श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध पौर्णिमा या दरम्यान शासकीय सन्मानात होणाऱ्या सोहळ्यांमध्ये श्री संत वासुदेव महाराज यांना बहुमान प्राप्त झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे संस्थेचे विश्वस्त अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर यांच्यासह हभप गणेश महाराज शेटे, विष्णू महाराज गावंडे, अनंता महाराज अवारे, साहेबराव मंगळे, माधवराव मोहोकार, अजय अरबट यांच्यासह भाविक उपस्थित होते. (फोटो)