सातव यांच्या जाण्याने यंग ब्रिगेडसह ज्येष्ठांनाही चटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:00+5:302021-05-17T04:17:00+5:30

अकाेला : युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर आपल्या नेतृत्वाची छाप निर्माण करणारे काॅंग्रेसचे खासदर राजीव सातव यांचे रविवार निधन झाले. ...

With the departure of Satav, the seniors along with the young brigade are also shocked! | सातव यांच्या जाण्याने यंग ब्रिगेडसह ज्येष्ठांनाही चटका !

सातव यांच्या जाण्याने यंग ब्रिगेडसह ज्येष्ठांनाही चटका !

googlenewsNext

अकाेला : युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर आपल्या नेतृत्वाची छाप निर्माण करणारे काॅंग्रेसचे खासदर राजीव सातव यांचे रविवार निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमधील यंग ब्रिगेडसह ज्येष्ठांनाही चटका बसला आहे. उमदे नेतृत्व अकालीच काळाने हिरावल्याचे दु:ख काॅंग्रेससह सातव यांच्या चाहत्यांमध्ये आहे.

..................

राजीव गांधी यांचे खंदे समर्थक व राज्यातून केंद्रात आपले नेतृत्व प्रभावीपणे निर्माण करणारा नेता हरविल्याने माेठे नुकसान झाले आहे. त्यांचे जाणे वेदनादायी आहे

बबनराव चाैधरी, महानगर काँग्रेस अध्यक्ष

................

राजीव सातव यांच्याशी अनेकदा भेटीचा प्रसंग आला. संघटनकाैशल्य व उत्तम जनसंपर्क असणारा नेता काळाने अवचित नेल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्राची हानी झाली.

हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

...................

पक्षासाठी माेठी हानी आहे,

ओबीसी समाजाला काॅंग्रेससाेबत कायम ठेवण्यात त्यांचा माेठा वाटा हाेता. येणाऱ्या काळात पक्षाने ताेच धागा वाढविला पाहिजे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

साजीद खान पठाण, काँग्रेस गटनेते मनपा

................

मी युवक काॅंग्रेसपासून त्यांच्यासोबत काम केले. दिल्लीत ताकद निर्माण करणारे तसेच दिलेल्या शब्दावर ठाम असणारे नेते म्हणून त्यांची ओळख हाेती. त्याचे जाणे वेदनादायी आहे.

माे. ब्रदू जम्मा, असंघटित कामगार संघटना अध्यक्ष

............................

युवक काॅंग्रेसच्या माध्यमातून त्यांच्याशी संबध आला. उमदे, प्रभावी तसेच प्रचंड जनसंपर्क असणारे ते नेते हाेते. त्यांचे जाणे पक्ष व समाजासाठी माेठी हानी आहे.

डाॅ. जिशान हुसेन, नगरसेवक काॅंग्रेस

.............................

माझे ज्येष्ठ बंधू, नेते हाेते. त्यांच्या अचानक जाण्याने देशपातळीवर काम करणारे नेतृत्व गमावले आहे. जवळचा मित्र, मार्गदर्शक गमावल्याची ही भावना क्लेशदायी आहे.

ॲड. महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष युवक काॅंग्रेस

...........................

सामाजिक बांधिलकी जपणारे, ओबीसींना काँग्रेस सोबत जोडणारा हा नेता कमी वयात जिंकला पण आजारासमाेर पराभूत झाला, त्याचे माेठे दु:ख आहे. काय बाेलावे, नि:शब्द आहे.

प्रकाश तायडे, काॅंग्रेसचे नेते

.....................................

राज्यातील हजारो युवकांचा दिल्लीतील आधार असलेला आश्वासक चेहरा हरपलेला आहे.

कपिल ढोके

प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश युवक कॅांग्रेस

.............

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार असा प्रवास करणारे त्याचे नेतृत्व हे युवकांना प्रेरणादायी हाेते.

डाॅ. सुधीर ढाेणे, प्रवक्ता काॅंग्रेस

...........................

युवक काँग्रेसमध्ये यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. उत्कृष्ट वक्ता, अभ्यासू वृत्ती, आणि मनमिळाऊ स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने व्यक्तिगत खूप मोठी हानी झाली .

कपिल रावदेव, प्रसिद्धिप्रमुख काॅंग्रेस

...........................

त्यांच्या घरासाेबत दाेन पिढ्यांचे संबध हाेते. अतिशय अभ्यासू व प्रामाणिक तसेच मेहनती नेतृत्व म्हणून त्यांची ओळख हाेती. त्यांचे अकाली जाणे हे क्लेशदायक आहे.

वामनराव देशमुख, संचालक, महानंद

............................

Web Title: With the departure of Satav, the seniors along with the young brigade are also shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.